फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील बाबरा परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. असह्य उकाड्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सोमवारी (दि. २७) रोजी तापमानाचा पारा तब्बल ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने संपूर्ण गाव व परिसर अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहे. दुपारच्या सुमारास तर परिस्थिती इतकी बिकट झाली की, नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले. परिणामी, गावातील मुख्य रस्ते भर दिवसा निर्मनुष्य दिसत होते.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे परिसरातील नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.
आरोग्यावर मोठा परिणाम उष्णतेमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, अंगातील अशक्तपणा अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे.
तापमान ४१ अंशांवर पोहचल्यावर दुपारी रस्ते ओस, नागरिक घरातच बंदिस्त झाले आहे. सकाळपासूनच सूर्याच्या कडक किरणांनी अंगाची लाहीलाही होत असून, दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असहा पातळीवर
पोहोचत आहे. यामुळे शेतकरी, कामगार, तसेच रोजंदारीवर अवलंबून असलेले नागरिक विशेषतः अडचणीत सापडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कामांनाही मोठा फटका बसत आहे. शेतकरी सकाळी लवकर किंवा
वाढत्या उन्हामुळे रस्ते झाले निर्जन गजबजलेले भागही निर्जन झाल्याने कर्फ्यू सारखे वातावरण निर्माण झाले होते.
दुकानदारांनीही दुपारच्या वेळेत दुकाने अर्धवट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे, तसेच लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
संध्याकाळीच शेतीची कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दिवसाढवळ्या शेतात काम करणे धोकादायक ठरत असल्याने अनेकांनी कामे थांबवली आहेत. परिणामी, शेती नियोजनावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. दुपारच्या वेळेत गावातील मुख्य बाजारपेठ, चौक, रस्ते पूर्णपणे सुनसान दिसुन येत आहे.













